राज्यातील ‘हे’ प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड अक्षय तृतीयेला सोने खरेदीवर देत आहेत विशेष ऑफर! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
gold rate

भारतामध्ये प्रामुख्याने सोने व चांदीचे खरेदी एखाद्या सणांच्या मुहूर्तावर किंवा लग्नसराईच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर केली जाते. दहा मेला अक्षय तृतीया हा महत्त्वाचा सण येत असल्यामुळे या दिवशी सोने व चांदी खरेदी करण्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून अक्षय तृतीया हा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो.

सध्या जर आपण सोन्या व चांदीचे दर पाहिले तर उच्चांकी पातळीवर आहेत. परंतु तरीदेखील सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही.

10 मेला अक्षय तृतीया हा महत्त्वाचा सण साजरा केला जाणार असून या निमित्ताने देशातील जे काही टॉप ज्वेलरी ब्रँड आहेत त्यांच्या माध्यमातून सोने खरेदीवर विशेष ऑफर देण्यात येत आहे. नेमक्या या ऑफर्स काय आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 देशातील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोने खरेदीवर देत आहेत विशेष ऑफर

1- मलबार गोल्ड हा एक प्रसिद्ध असा ज्वेलरी ब्रँड असून ग्राहकांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी एक विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मलबार ब्रँडच्या माध्यमातून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी वर विशेष ऑफर देण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोन्याच्या मेकिंग चार्ज वर 25% सूट देण्यात येणारा असून ही ऑफर 27 एप्रिल ते बारा मे 2024 पर्यंत असणार आहे.

तसेच मलबार गोल्ड या ब्रँडच्या माध्यमातून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर देखील 25 टक्क्यांची सूट देत आहे. एवढेच नाही तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डधारकांना 25000 रुपयांच्या कमीत कमी खरेदीवर पाच टक्के कॅशबॅकचा लाभ देखील मिळत असून ही ऑफर एक ते दहा मे पर्यंत असणार आहे.

2- तनिष्क ज्वेलरी ब्रँड तनिष्क हा टाटाचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असून संपूर्ण देशांमध्ये नावाजलेला आहे. या ब्रँडच्या माध्यमातून देखील अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खास ऑफर देण्यात आली आहे व यामध्ये सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 20 टक्क्यांचे सूट देण्यात येत असूनही ऑफर दोन मे ते बारा मे पर्यंत असणार आहे.

3- जॉयलुक्का ज्वेलरी ब्रँड जॉयलुक्का ब्रँडच्या माध्यमातून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना विशेष सवलत देण्यात येत असून ग्राहकाने जर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी केली तर ग्राहकांना 1000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येत असून ही ऑफर तीन मे ते 13 मे पर्यंत असणार आहे.

तसेच दहा हजार रुपयापेक्षा जास्त किमतीच्या चांदीच्या दागिन्याच्या खरेदीवर ग्राहकांना 500 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. 50000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर दोन हजार रुपयांची गिफ्ट व्हाउचर मिळत असून ही ऑफर 26 एप्रिल ते बारा मे 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe