कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 12 मे ला लॉन्च होणार मारुती सुझुकीची ‘ही’ भन्नाट कार, फिचर्स आणि किंमत पहा….

Tejas B Shelar
Published:
Maruti Suzuki New Car Launching

Maruti Suzuki New Car Launching : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. दरम्यान नजीकच्या भविष्यात मारुती सुझुकीची कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मारुती सुझुकीच्या ग्राहकांना आता बाजारात लवकरच एक नवीन विकल्प दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी 12 मे ला आपल्या एका लोकप्रिय कारचे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे.

मारुती सुझुकी 12 मे 2024 ला चौथ्या जनरेशनची स्विफ्ट कार इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करणार असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे. खरंतर प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चौथ्या जनरेशनच्या स्विफ्टची चर्चा पाहायला मिळत होती. अखेरकार ही गाडी आता भारतीय कार बाजारात लॉन्चिंगसाठी रेडी आहे.

लाँचिंगपूर्वी ही गाडी डीलरशिपकडे पोहचू देखील लागली आहे. आता आपण मारुती सुझुकीच्या या चौथ्या जनरेशनच्या अपकमिंग स्विफ्टचे म्हणजे Swift ZXi ट्रिमचे फिचर्स कसे राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी राहणार 4th Generation Swift

Swift ZXi लॉन्चिंगची डेट समोर आल्यानंतर ग्राहकांच्या माध्यमातून या कारचे फिचर्स कसे राहणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या गाडीबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ही अपकमिंग कार टॉप-स्पेक ZXi+ च्या खालचे एक ट्रिम राहणार आहे. ही नव्याने लॉन्च होणारी कार खरेदीदारांमध्ये लोकप्रिय होईल अशी शक्यता आहे. या गाडीत 3ऱ्या पिढीच्या मॉडेलप्रमाणे, मागील टेल लाइट आणि पूर्ण श्रेणीचे एलईडी दिवे उपलब्ध आहेत.

पण, या गाडीच्या बाहेरील बाजूस LED DRLS राहणार नाहीत. तथापि, ZXi मध्ये हेडलाइट्मध्ये एलईडी हायलाइट देण्यात आले आहेत. ZXi मध्ये आधीच्या स्विफ्टच्या तुलनेत अनेक भन्नाट फीचर्स राहणार अशी माहिती दिली जात आहे.

या गाडीला मोनोटोन सिल्व्हर शेडमध्ये तयार केलेले 15-इंच अलॉय व्हील दिले जाणार आहेत, जे की सेकंड जनरेशन प्रमाणे भासत आहे. या गाडीच्या बाहेरील भागात मागील वॉशर आणि वायपर दिलेले आहेत. ZXi वर ब्लॅक पोल आणि ड्रायव्हर-साइड रिमोट सेन्सर्स आहेत.

गाडीच्या इंटेरियर बाबत बोलायचं झालं तर या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीमध्ये आतील बाजूस, नवीन प्रथमच रीयर एसी व्हेंट्स दिले गेलेले आहेत. एक संपूर्ण हवामान नियंत्रण प्रणाली आणि 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन फ्री-स्टँडिंग एलिमेंटमध्ये ठेवलेली पाहायला मिळतं आहे.

स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, पुश-बटण स्टार्ट, सेमी विथ मिड. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे मारुती सुझुकी स्विफ्ट ZXi ट्रिमला आधीच्या मॉडेल पेक्षा हटके बनवणार आहे. या गाडीच्या इंजिन बाबत बोलायचं झालं तर यामध्ये कंपनीने नवीन 1.2L 3-सिलेंडर Z मालिका इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 80bhp पॉवर आणि 112nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

ही गाडी 25.72 किमी/लीटर मायलेज देऊ शकते असे सांगितले जात आहे. खरे तर मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट ही कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे आणि आता या मॉडेलची चौथ्या जनरेशनची कार लाँच होणार आहे. त्यामुळे या गाडीला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद दाखवला जातो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe