धक्कादायक ! करिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा केला होता सौदा

Published on -

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-बॉलिवूडची अभिनेत्री करीश्मा कपूर लग्नानंतर बॉलिवूडपासून दूरच राहिली आहे. करिश्माने तिच्या घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या संपूर्ण सासरची मंडळी तिचा छळ करायचे असा आरोपही तिने केला होता.

एका मुलाखतीत करिश्माने एक धक्कादायक गोष्ट उघड केली होतो. जेव्हा ती आणि संजय हनिमूनला गेले होते तेव्हा संजयने त्याच्या काही मित्रांसोबत करिश्माचा सौदा केला होता.

करिश्माने सांगितले की संजयने तिला संपूर्ण एक रात्र त्याच्या मित्रांसोबत घालण्यास सांगितले. जेव्हा ती या गोष्टीसाठी तयार झाली नाही तेव्हा त्याने तिला खूप मारले होते.

याशिवाय करिश्माने हे देखील सांगितले की सासरी तिच्या सासूसोबत पटत नव्हते. तिची सासू तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून हात उचलायची.‌ एवढेच नाही तर संजय त्याच्या भावाला करिश्मावर नजर ठेवायला सांगायचा.

तसेच संजय लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि तिला मारायचा. करिश्माने सतरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ ला बिझनेस मॅन संजय कपूर सोबत लग्न केले होते.

या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. लग्नानंतर पाच-सहा वर्षातच त्यांच्या नात्यात कटूता आली होती.

त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनीही नाते संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करिष्मा तिची आई बबिता कडे येऊन राहू लागली. २०१६ या दोघांनी घटस्फोट घेतला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News