श्रीगोंदा :- तालुक्याच्या आमदारांना तुमचे काहीएक देणे नाही. अजून एक कारखाना कसा होईल, यासाठी ते काम करत आहेत.
माजी आमदार तर उसाचे पैसेच देत नव्हते. मला लक्ष घालावे लागले. मग पैसे मिळाले. राधाकृष्ण विखेंना काँग्रेसने काय कमी केले,
म्हणून ते मुलाला खासदार करण्यासाठी भाजपत गेले? ही मंडळी सत्ता आणि स्वार्थासाठीच काम करतात, अशी टीका आ.बच्चू कडूंनी केली.

देशात आणि राज्यात अनेकांनी सत्ता उपभोगली. मात्र, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आमदार, खासदारांनी तुमची मते घेतली आणि तेथे जाऊन वकिली मात्र त्यांच्या पक्षाची केली.
आजपर्यंत धर्म, जात आणि पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकून मतदारांना त्यांनी गुलाम केले. नेत्यांच्या विकासाला आणि तुमच्या अधोगतीला तुम्हीच जबाबदार आहेत.
यापुढील काळात तुम्ही गुलामी सोडून द्या. आमदार, खासदार तुमच्यापुढे घुडघे टेकवतील, असे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी आढळगाव येथील जाहीर सभेत सांगितले.

राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकरी पिकाला भाव मागत असताना त्यांची किरकोळ अनुदानावर बोळवण करून त्यांना गुलामीत ठेवण्याचे काम पंतप्रधानांनी केले.
राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र, स्वामिनाथन आयोग लागू होत नाही. त्यासाठी मी लढत आहे. पण एकटा काय करणार.
मला राज्यातून पाच आमदार द्या. आम्ही तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, असे ते म्हणाले.
- भविष्यवाणी खरी ठरली ! सोन्याच्या किंमतीने आज सर्व रेकॉर्ड मोडलेत, 22 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा
- मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन, कसा असणार रूट? वाचा…
- Ahilyanagar News : अहिल्यानगरकरांनो सावध व्हा ! दुष्काळाची चाहूल… तब्बल 643 गावं आणि 2415 वाड्यांमध्ये पाणी टंचाई
- लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली नवीन अपडेट
- राजधानी मुंबईतील घरांसाठी म्हाडा लवकरच ‘या’ नियमांमध्ये बदल करणार ! मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे परवडणार