Ahmednagar News : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. निसर्गाचा कोप आणि वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे बाजरीचे पीक घेणे काही वर्षापासून कमी होत चालले होते.
परंतु यंदा प्रथमच शेतकरी पुन्हा उन्हाळी बाजरीला प्राधान्य देत पाचेगाव भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. मात्र उन्हाळी बाजरी सोंगणीसाठी मजूर एकरी तीन पोते घेत असल्याने शेतकऱ्यांनी उभ्या बाजारीची सोंगणी हार्वेस्टरने करीत आहे.

आज रोजी बाहेरून आणलेल्या बाजारीला साधारण ३ हजार रुपये किंट्टल दर मिळत आहे. त्यामुळे एकरी तीन पोते म्हणले तर ते ९ हजारांचे होते. मग एकरी बाजरी काढण्यासाठी जर ९ हजार रुपये लागत असले
तर हार्वेस्टरने बाजरी सोंगणी केलेली काय? वाईट, असा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. आणि हव्हॅस्टरचे दर एकरी अडीच हजार रुपये आहे. विशेष म्हणजे बाजरी पिकांचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे दिसून आले आहे.
फक्त पशुसंवर्धनसाठी चारा मिळणार नाही. पण कमी कालावधीत आपली उन्हाळी बाजरी घरी जाते व कमी खर्चात बाजरी सोंगणी होते. यांच्यातच शेतकरी खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होत असल्याने शेतकरी समाधानी आहे. यापुर्वी येथील शेतकरी दुकानात मिळणारी गुजरात बाजरी घेऊन खात होते. चालू वर्षी मात्र शेतकरी उन्हाळी बाजरीला प्राधान्य देत असल्याने या भागातीलच उन्हाळी बाजरी खायला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
चार ते पाच वर्षापूर्वी बाजरीला मिळणारा दर अत्यल्प होता. साधारण नऊशे ते अकराशे, असा दर मिळत होता. त्यात अति पाऊस झाला, बाजरी भिजली तर दर आजून कमी मिळत. त्यामुळे उत्पादन खर्च देखील वसूल होत नव्हता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी पीक घेणे सोडून दिले होते.
या भागातील शेतकरी बाजरी न करता आपल्याला वर्षाकाठी लागणारी बाजरी विकत घ्यायची असा निर्णय घेतला, पण या भागातून बाजरी नामशेष झाल्यानंतर मात्र बाजरी ३ हजाराचा टप्पा पार करीत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बाजरी पीक करण्यासाठी वळले. आणि उन्हाळी बाजरी पीक देखील चांगल्या प्रकार दिसून येत आहे.