‘हे’घरगुती पदार्थ वापरा आणि चेहऱ्यावरील डाग घालवा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- सध्याची बदलती जीवनशैली, वाढलेले प्रदूषण, कामाचा अतिरिक्त तणाव आदींचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. चेहरा व त्यावरील त्वचा नाजूक असल्याने जास्त इफेक्ट त्यावर होत असतो.

यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, काळे डाग पडणे, ब्लॅक स्पॉट आदी अपाय चेहऱ्यास होतो. हे घालवण्यासाठी , निस्तेज त्वचा, दाग-धब्बे हटवण्यासाठी काही घरगुती, सोप्या उपायांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

1 ) पपई –
पपई हे फळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.  पपईमध्ये असणार पपीन नावाचं तत्व  त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्याचं काम करतं. पपईचा गर बारीक करुन त्यात एक चमचा मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा.

त्वचा ड्राय असल्यास त्यात मिल्क-क्रीमही मिसळू शकता. ऑयली त्वचा असणारे या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबू रस टाकू शकता. हे मिश्रण दररोज लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

२) एलोवेरा
एलोवेरा अर्थात कोरफड ही जास्त पाण्याची ठिकाणी, नदीकिनारी मिळते.  त्वचा आणि चेहऱ्याची सुंदरता कायम राखण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.

कोरफड Black spots Removal क्रिम म्हणून काम करतं. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ईचं तेल आणि लिंबू रस मिळवून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग जाण्यास मदत होते.

३) पुरेसे पाणी प्या –
दिवसभरात शरीरासाठी लागणारं पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. पाणी त्वचेचं सौदर्य राखण्यास, त्वचा चमकदार, ग्लोइंग करण्यास मदत करतं.

४) ताक – ताकामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर असते.  चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

५) दही-लिंबू –
त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी लिंबू अतिशय उत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन आणि लॅक्टिक अॅसिड असतं. लिंबू रसात दही मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होऊ शकते.

दही आणि लिंबूच्या पेस्टमध्ये थोडी साखर टाकून ती लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन हटवून चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment