पोल्ट्री व्यवसायातून कमवायचा असेल बक्कळ पैसा तर पाळा ‘या’ जातीची कोंबडी! अंडी उत्पादनातून देखील कमवाल पैसा

Ajay Patil
Published:
prataapdhan hen

शेतीला आवश्यक असणाऱ्या जोडधंद्यांमध्ये ज्याप्रमाणे पशुपालन आणि शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो अगदी त्याचप्रमाणे आता पोल्ट्री व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत. पोल्ट्री व्यवसायामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही संकल्पना आल्यामुळे अनेक शेतकरी आता पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधताना आपल्याला दिसून येत आहे.

याशिवाय अनेक शेतकरी काही गावरान जातींच्या कोंबड्यांचे पालन करून देखील अंडी उत्पादनातून चांगला पैसा मिळवतात. तसे पाहायला गेले तर कोंबड्यांच्या अनेक देशी जाती देखील पोल्ट्री व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे आहेत. देशी कोंबड्यांच्या प्रत्येक जातीचे अंडी देण्याची क्षमता देखील वेगवेगळी असल्याने पोल्ट्री उद्योगासाठी जर गावरान कोंबडी पाळायची असेल तर जातिवंत जातीची निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते.

गावरान कोंबडी पालनामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गावरान कोंबड्यांच्या मांसाला आणि अंड्यांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने हा व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो.

त्यामुळे तुम्हाला देखील जर गावरान कोंबडी पालनातून चांगला पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही प्रतापधन या जातीच्या कोंबड्यांचे पालन करून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात.

 प्रतापधन कोंबडीचे पालन ठरेल फायद्याचे

महाराणा प्रताप कृषी आणि प्रादयोगीकी विश्वविद्यालय, उदयपूर यांच्या माध्यमातून प्रताप धन ही कोंबडीची जात विकसित करण्यात आलेली आहे. इतर कोंबडीच्या जातीच्या तुलनेत ही प्रत्येक गोष्टीत सरस असून  गावरान कोंबड्यांचा जर आपण विचार केला तर एका वर्षामध्ये साधारणपणे 83 अंड्याचे उत्पादन देतात.

परंतु या तुलनेत जर प्रतापधन कोंबडीचे अंडी उत्पादन पाहिले तर ते एका वर्षात 161 अंडी इतके आहे. ग्रामीण भागामध्ये अगदी सहजतेने शेतकरी प्रतापधन कोंबडीचे संगोपन करू शकतात. म्हणजेच टक्केवारी पाहिले तर इतर गावरान जातीच्या कोंबड्या या 21 टक्क्यांपर्यंत अंड्यांचे उत्पादन वार्षिक देतात

तर प्रतापधन जातीची कोंबडी ही एका वर्षामध्ये जवळपास इतर गावरान जातींच्या तुलनेत तीन पट अधिक अंड्याचे उत्पादन देते.यामुळे जर नवीन तरुण आणि शेतकऱ्यांना जर पोल्ट्री व्यवसायामध्ये यायचे असेल तर असे तरुण व्यावसायिक पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी प्रतापधन प्रजातीची कोंबडी पालन करून पोल्ट्री व्यवसायला सुरुवात करू शकतात व आर्थिक यश मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe