अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- आज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने कालचा विक्रम मोडीत काढला आहे. आज दिवसभरात तब्बल 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 131 झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले .नगर शहरातील ०३ पाथर्डी, संगमनेर येथील प्रत्येकी ०१ आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार घेत असलेला रुग्णही बरा झाला आहे. जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ६८ आहे.
आज दिवसभरात जिल्ह्यात १४ नवीन रुग्ण वाढले सकाळी आलेल्या अहवालात ०७ व्यक्ती बाधीतांत नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत. यात एक महिला आणि ०४ पुरुष. सथ्था कॉलनीतील हे कुटुंब. संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले.
सायंकाळी प्राप्त अहवालात ०७ व्यक्ती बाधीत आढळून आल्या. राशीन (कर्जत) येथील ७० वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय मुलगी बाधीत. कालच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत संगमनेर येथील एकाच कुटुंबातील १३ आणि १७ वर्षीय मुले बाधित. कालच्या बाधित रुग्णाचे नातेवाईक आहेत.
शिर्डी येथील ५५ वर्ष वयाची महिला बाधित. निमगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कात आली होती. घाटकोपर येथून धामणगाव पाट (अकोले) येथे आलेला ४९ वर्षीय व्यक्ती बाधित आहे. भांडूप येथून कारेगाव (नेवासा) येथे आलेला ३५ वर्षीय युवक बाधित आहे.
महानगरपालिका क्षेत्र २३, अहमदनगर जिल्हा ६७, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ३१ आहे. जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ५० (+०१ नाशिक, +०२संगमनेर आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com