बारावीमध्ये कमी गुण मिळालेत का? नका करू काळजी? शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, होईल विद्यार्थ्यांना फायदा

Ajay Patil
Published:

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्याचा विचार केला तर मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे यावेळी दिसून आले. निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना जर अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क्स मिळाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी दिसून येते.

परंतु जर असे काही विद्यार्थी असतील की त्यांना जर बारावीचा निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाले असतील तर त्यांच्याकरिता आता महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

 बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तर पुन्हा बसता येईल परीक्षेला

ज्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाले असतील असे विद्यार्थी आता पुन्हा एकदा परीक्षेला बसू शकणार आहेत व अशा पद्धतीचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. अगदी त्याचप्रमाणे आता कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संबंधीची माहिती दिली व त्यांनी म्हटले की, बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत अशी मुलं पुन्हा परीक्षेसाठी बसण्यास पात्र ठरतील. ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये कमी गुण मिळाले आहेत त्यांनी नाराज न होता अशा विद्यार्थ्यांकरिता लवकरच परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली व या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे देखील त्यांनी म्हटले.

संपूर्ण परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असतील किंवा काही विषयांमध्ये कमी गुण मिळाले असतील तर परीक्षेला कसे बसता येईल किंवा या संबंधीची प्रक्रिया कशी असेल? याविषयीची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले की बारावीचा निकाल यावर्षी आठ दिवस अगोदर जाहीर झाला आहे.

दोन दिवसा अगोदरच निकाल जाहीर होणार होता मात्र राज्यात पाचव्या टप्प्याचे मतदान होणे बाकी होते व त्यामुळे राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.

साधारणपणे 16 जुलैच्या दरम्यान यासाठीच्या पुन्हा परीक्षा होतील व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी देण्यात येणार आहे व हा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होईल असे देखील महत्त्वाची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe