Ahmednagar Breaking ! हॉटेलवर सुरु होतं भलतंच ‘काम’ ! एका महिलेची सुटका; दोन जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाणवाडी परिसरातील हॉटेल प्रतीकवर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेत पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका केली.

कुंटणखाना चालविणार्‍या छाया शशिकांत चव्हाण रा. शिरूर, या महिलेसह हॉटेल मालक पप्पू राक्षे रा.गव्हाणवाडी, या दोघांवर लायसन ऑफिसर संस्था फ्रीडम फॉर्म, पुणे येथील मोजेस प्रभाकर कसबे( वय ३९) वर्ष यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कौ, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडी ‘पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाणवाडी परिसरातील हॉटेल प्रतीक, या ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील महिलांसाठी काम करणाऱ्या लायसन ऑफिसर संस्था फ्रीडम फॉर्म, पुणे यांच्यासह पोलिस पथकाने छापा टाकला असता, तेथे महिला हॉटेल मालकाच्या मदतीने परराज्यातील महिलांच्या सहाय्याने वेश्या व्यवसाय करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी छापा मारत एका महिलेची सुटका केली.

महिलांना बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह हॉटेल मालक पप्पू राक्षे रा.गव्हाणवाडी, या दोघांवर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe