शहर सहकारी बँकेचे अकाऊन्ट हँक करून ४५ लाखांची रक्कम परस्पर ट्रान्सपर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील अकाउंट वरून सुमारे 45 लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवर वर्ग करण्यात आले.

रविवारी हा प्रकार घडल्यानंतर शहर बँकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत शाखेमध्ये चालू खाते आहे. रविवारी बँकाना सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी शहर बँकेच्या खात्यातून 45 लाख रुपये वर्ग झाल्याचे SMS बँकेच्या अधिकार्‍यांना आले.

हे पैसे 27 वेगवेगळ्या बँक खात्यावर वर्ग झाले. शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आयडीबीआय बँक ही कल्पना दिली.

आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे वर्ग झालेली काही बँका ती तात्काळ गोठवली.

त्यामुळे शहर बँकेच्या मोठ्या रकमेची फसवणूक बँकेने अधिक माहिती घेतल्यानंतर वर्ग झालेल्या काही बँक खात्यामधून मात्र सहा लाख रुपये आणखी वेगळ्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत.

या पैशाबाबत पोलीस तपास करत आहेत. मंगळवारी शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी एसपी कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बँक अकाउंट हॅक करून पैसे दुसऱ्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे.

आतापर्यंत एकूण चाळीस लाख रुपये वर्ग केलेले खात्यावरील व्यवहार बँकेशी संपर्क करून थांबविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment