भर दिवसा विद्यार्थ्याला फूस लावून पळवून नेले !

Published on -

संगमनेर – संगमनेर परिसरात घुलेवाडी भागात राहणारा सूरज नामदेव देवकर, वय १७ वर्ष हा विद्यार्थी मी फोटो काढून व अॅडमिशन घेवून येतो, असे म्हणून घरातून दुपारी २ च्या सुमारास गेला.

त्याला कुणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेउन फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलाचे नातेवाईक अलका रामु देवकर, रा. घुलेवाडी यांनी संगमनेर शहर पोलिसांत वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम १६३ प्रमाणे गरनं. ४०२ दाखल करण्यात आला असून पोना पालवे मूलाचा व आरोपीचा शोध घेत आहेत.

या घटनेने पालक वगांत खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोसई कवडे यांनी भेट दिली .नातेवाईकांनी सर्वत्र विध्यार्थ्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News