महत्वाची बातमी : उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद ? वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचे एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर,

सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दि. 01 जून रोजीपासुन ते दि.30 जून 2020 रोजीच्या मध्यरात्री वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या आदेश अन्‍वये खालील बाबींस मनाई करीत आहे. 
  • सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील.
  • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था/ प्रशिक्षण संस्‍था/ कोचींग क्‍लासेस इत्‍यादी बंद राहतील
  • आंतरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.
  • स्‍वतंत्र आदेश आणि एसओपीव्‍दारे अनुमती दिलेल्‍या व्‍यतिरिक्‍त रेल्‍वे प्रवासी वाहतूक
  • व देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.
  • सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव,
  • मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहतील.
  • सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन,
  • Academic, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्‍यादीसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई राहील.
  • सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे/ प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील.
  • कटिंग सलून, स्‍पा, ब्‍युटीपार्लर बंद राहतील.
  • शॉपिंग मॉल्‍स, हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट व आदरातिथ्‍य सेवा बंद राहतील.

अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर/ फिरण्‍यावर रात्री 9.00 ते सकाळी 5.00 या कालावधीत निर्बंध राहील.

65 वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्‍यावश्‍यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्‍यास मनाई राहील.सर्व नागरिकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्‍यास मनाई राहील.

*अहमदनगर जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता वरील प्रमाणे प्रतिबंधीत केलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेल्‍या सर्व व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

परवानगी दिलेल्‍या व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) कोणत्‍याही शासकीय प्राधिकरणाच्‍या परवानगीची आवश्‍यकता असणार नाही.
क्रीडासंकूले, स्‍टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्‍यायामासाठी खुले ठेवण्‍याची परवानगी असेल.

तथापी प्रेक्षक वा सामूहिक जमावाला परवानगी असणार नाही. बंदिस्‍त स्‍टेडियम मध्‍ये कोणत्‍याही क्रिडाविषयक बाबींना परवानगी असणार नाही.

शारिरीक व्‍यायाम व इतर व्‍यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी सामाजिक अंतराच्‍या (Social Distancing) निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील.

सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस खालील प्रमाणे परवानगी असेल. दुचाकी –  1 स्‍वार, तीन चाकी – 1 + 2, चार चाकी -1 + 2

जिल्‍हांतर्गत बस सेवेस जास्‍तीत-जास्‍त 50 टक्के क्षमतेसह व शारिरीक अंतर आणि स्‍वच्‍छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.

सर्व बाजारपेठा /दुकाने सकाळी 9 ते सायं.5 या कालावधीत खुली राहतील. तथापी बाजारपेठा / दुकानांचे ठिकाणी गर्दी आढळल्‍यास व सामाजिक अंतराचे पालन न झाल्‍यास स्‍थानिक प्रशासन त्‍वरीत अशा बाजारपेठा/ दुकाने बंद करण्‍याची कार्यवाही करतील. पेट्रोलपंप 24 तास सुरु राहतील.

काही विशिष्‍ट प्रकरणात व्‍यक्‍ती व वस्‍तूंची हालचाल सुनिश्चित करण्‍यासाठी विशिष्‍ट दिशानिर्देशांनुसार खालील मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्‍वांचे पालन करावे.

सर्व प्राधिकरणांनी कोणत्‍याही प्रकारचे निर्बंध न लादता वैद्यकीय व्‍यवसायिक, परिचारीका, पॅरामेडिकल स्‍टाफ, स्‍वच्‍छता कर्मचारी आणि रुग्‍णवाहिकांच्‍या राज्‍यांतर्गत व आंतरराज्‍य हालचालीस परवानगी परवानगी द्यावी.

व्‍यक्‍तींच्‍या आंतराज्‍यीय व आंतरजिल्‍हा हालचाली तसेच अडकलेले मजूर, स्‍थलांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, यांच्‍या हालचाली एसओपीनुसार नियमित करण्‍यात याव्‍यात.

श्रमिक विशेष रेल्‍वेव्‍दारे आणि समुद्री प्रवास करणा-या व्‍यक्‍तींच्‍या हालचाली एसओपीनुसार नियमित करण्‍यात याव्‍यात.
देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरिक आणि परदेशी जाण्‍यासाठी विशिष्‍ट व्‍यक्‍तींचे, परदेशी नागरिकांचे व भारतीय समुद्री प्रवाशांचे येणे व जाणे एसओपीनुसार नियमित करण्‍यात यावे.

सर्व प्राधिकरणांनी सर्व प्रकारच्‍या आंतरराज्‍यीय वस्‍तू/मालवाहतुक व रिकाम्‍या ट्रक यांचे वाहतुकीस परवानगी द्यावी.

अहमदनगर जिल्‍हामध्‍ये सार्वजनिक ठिकाणी व कामाचे ठिकाणी कोव्‍हीड19 चे व्‍यवस्‍थापनाचे दृष्‍टीने खालील राष्‍ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाचे ठिकाणी आणि प्रवासा दरम्‍यान मास्‍क वापरणे अनिवार्य आहे. सर्व व्‍यक्‍तींनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्‍ये कमीत कमी 6 फुट अंतर ठेवावे.

दुकानांचे ठिकाणी ग्राहकांमध्‍ये शारिरीक अंतराचे (Physical Distancing) चे पालन करावे आणि 5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास परवानगी असणार नाही.

विवाह समारंभात सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन जास्‍तीत-जास्‍त 50 व्‍यक्‍तींस उपस्थित राहण्‍यास परवानगी असेल.

अंत्‍यविधीस सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन जास्‍तीत-जास्‍त 20 व्‍यक्‍तींस उपस्थित राहण्‍यास परवानगी असेल.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी.

सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू इत्‍यादींचे सेवन करण्‍यास प्रतिबंध राहील.
कामाच्‍या ठिकाणांसाठी खालील अतिरिक्‍त मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

शक्‍य असल्‍यास वर्क फ्रॉम होम करण्‍यास प्रोत्‍साहन द्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक व व्‍यावसायिक आस्‍थापनांमध्‍ये कर्मचारी व ग्राहक यांची गर्दी होणार नाही यास्‍तव कामांच्‍या व व्‍यवसायांच्‍या वेळांचे नियोजन करावे.

कामाचे ठिकाणी आत येण्‍याचे व बाहेर जाण्‍याचे मार्ग तसेच सामाईक मोकळ्या जागांचे ठिकाणी थर्मल स्‍कॅनर, हॅण्‍ड वॉश व सॅनिटायझर्स पुरविण्‍यात यावे.

कामाचे ठिकाणी, सुविधा केंद्राचे ठिकाणी सर्वसामान्‍यपणे वेळोवेळी हाताळण्‍यात येणारे भाग/वस्‍तू (उदा.दरवाजाचे हॅण्‍डल, लिफ्ट स्‍वीच, विजेची बटणे इ.) यांचे वेळोवेळी / शिफ्टचे दरम्‍यान निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे.

कामांचे ठिकाणांचे सर्व प्रभारी यांनी त्‍याठिकाणी कामगार / कर्मचारी यांचेमध्‍ये योग्‍य अंतरासह तसेच शिफ्ट दरम्‍यान व जेवणाची वेळ या दरम्‍यान योग्‍य अंतर ठेवुन सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करावे.

कोणतीही व्‍यक्‍ती/ संस्‍था/ संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment