जामखेडला जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले
13 Jun 2019, 7:11 PM IST
जामखेड: शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींची शाळा येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या वादळाने सहा वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने शाळांना सुट्टी आसल्याने मोठा अनर्थ टळला. या शाळेत एकुण 800 मुले व मुली शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे हाच प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
जमीन अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्या- राहुल जगताप
13 Jun 2019, 6:58 PM IST
नगर: श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी पाटबंधारे विभाग यांनी कुकडी प्रकल्पासाठी चांदगाव, शेडगाव, टाकळी लोणार या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत.
त्याबदल्यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला आज अखेरपर्यंत देण्यात आला नसून तो मोबदला लवकरात लवकर द्यावा त्यासंदर्भात आमदार राहुल जगताप यांनी भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी किसवे, भूमी अभिलेखचे उपाधीक्षक भांदुर्गेसह कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
राज्यात आघाडीचाच झेंडा फडकणार; आमदार बाळासाहेब थोरात
13 Jun 2019, 6:31 PM IST
संगमनेर: कॉंग्रेसचे तत्त्वज्ञान शाश्वत आहे. कॉंग्रेसला संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे कोणत्याही लाटेने कॉंग्रेस संपणार नाही.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकजुटीने आगामी विधानसभा निवडणूक लढवेल आणि राज्यात परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहता येथे बोलताना व्यक्त केला.
राहता येथे कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार थोरात बोलत होते.
पिकांची नासाडी करत निळवंडे कालव्यांच्या कामास प्रारंभ
13 Jun 2019, 5:35 PM IST
अकोले: मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेला शब्द फिरवला. दुसऱ्याच दिवशी उभ्या पिकांची नासाडी करत निळवंडे कालव्याच्या खोदाई कामाला प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आला आला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवण्याची कृती केली, अशी भावना कालवेग्रस्त शेतकऱ्यांत पसरली असून, तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.
महावितरण कार्यालयाच्या खुर्च्यांची तोडफोड …
13 Jun 2019, 5:11 PM IST
अहमदनगर महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे पोलीस मुख्यालयातील पोलीस कन्येचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ सांगळे गल्ली येथील महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांनी आपला मोर्चा वळविला.संबंधित महावितरण च्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाच्या खुर्च्यांची तोडफोड केली. रस्त्यावर फेकुन दिल्या.
विजेचा शॉक बसून पोलिसाच्या मुलीचा मृत्यू
13 Jun 2019, 2:15 PM IST
अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या पोलिसाची मुलगी कु. पूजा सुनील कुऱ्हे ही MBA शिकत असलेल्या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.
हवालदार सुनील कु-हे हे आपल्या कुटुबासह पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहत आहेत. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे त्यांच्या घरावरील पत्रे व भिंतींत वीजप्रवाह उतरला होता.
दरम्यान आज दुपारी पूजा घरात असताना तिला विजेचा झटका बसला. कुटुंबियांनी तातडीने तिला रुग्णालयात हलविले. मात्र तिचा तत्त्पुर्वीच मृत्यू झाला.
मुलीचे पहिले लग्न लपवून साडेतीन लाखांचा गंडा
13 Jun 2019, 2:07 PM IST
मुलीचे पहिले लग्न झाल्याची माहिती लपवून मंचरे कुटुंबाने दहेगाव बोलका येथील मिसाळ कुटुंबाला फसवून साडेतीन लाखाला गंडविले.
तसेच खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली व चोरी केल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)
बॅन्जो गाडीला अपघात : एक ठार तर सात जखमी
13 Jun 2019, 1:21 PM IST
जामखेड: लग्नाची सुपारी वाजवायला निघालेल्या बँन्जो गाडीला पैठण – पंढरपुर मार्गावरील जातेगावफाटा परिसरात अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य सात कलाकार जखमी झाले आहेत.
कलेक्शन करणाऱ्याला चोरट्यांनी लावला अडीच लाखाला चुना
13 Jun 2019, 12:21 PM IST
#अहमदनगर – शहरात व उपनगरात कलेक्शन करणाऱ्याच्या दुचाकीत ठेवलेली 2 लाख 40 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
केडगाव परिसरातील अंबिका हॉटेल समोर आज बुधवारी(दि.12) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अंकुश भगवान गायखे यांनी फिर्याद दिली आहे.
वन विभागाच्या कार्यालयात ओली पार्टी
13 Jun 2019, 10:21 PM IST
अहमदनगर- नगर वन विभागाच्या मुख्यालयातच मंगळवार (दि.11) रोजी दुपारी एका वन अधिकार्याने सेवानिवृत्ती निमित्ताने सामिश जेवणाची पार्टी दिली.
या जेवणावळीला अर्थातच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ-कनिष्ठांना आवर्जून निमंत्रण देण्यात आले होते. मात्र हे सर्व करत असताना वन खात्याच्या सरकारी जागेतील नर्सरीतच दोन बोकड कापण्यात आले.
एव्हढेच नव्हे तर जेवणा अगोदर मस्त पैकी ओली पार्टी झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेे वन विभागाचे मुख्यालय चर्चेत आले आहे.
नगर शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक
13 Jun 2019,09:21 PM IST
अहमदनगर शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून सुमारे ४५ लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले.
खात्यातून पैसे गेल्यानंतर दोन्ही बँकांनी तत्परता दाखविल्यानंतर बँक खाती गोठविण्यात आल्याने खात्यातील पैसे काढता आले नाहीत
मेजर बाबासाहेब बडे यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार
13 Jun 2019,07:21 PM IST
#पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील मानेवाडी येथे मेजर बाबासाहेब दशरथ बडे यांच्यावर शोकाकुळ वातावरणात बुधवारी (दि.12) सायंकाळी 6.30 वा. अत्यंसंस्कार करण्यात आले.
यावेळी बंदुकांनी हवेत गोळीबार करीत स्व. मेजर बाबासाहेब बडे यांना सलामी देण्यात आली. यावेळी जिल्ह्यासह तालुक्यातील मान्यवर व्यक्तींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.