नेवासा :- तालुक्यातील चारी नं. चार सोनई परिसरात पानसवाडी रस्ता भागात राहणारी शेतकरी महिला अश्विनी सोमनाथ तागड, वय ३० हिला ९ जणांनी जमाव जमवून आमच्याविरुद्ध सोनई पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे या कारणावरुन शिवीगाळ करत चाकू, गुप्ती, काठीने वार करुन तलवारीचा धाक दाखवून बेदम मारहाण केली.
आरोपी महिला सुप्रिया रविंद्र गडाख हिने अश्विनी तागड या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण बळजबरीने काढून नेले.
जखमी अश्विनी सोमनाथ तागड या विवाहित तरुणीने सोनई पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी भाऊसाहेब पोपट गडाख, दीपक भाऊसाहेब गडाख, विद्र भाऊसाहेब गडाख, सुप्रिया रविंद्र गडाख, काशीनाथ यशवंत गडाख, शिवाजी काशिनाथ गडाख , राहुल पद्माकर दरंदले , सर्व रा. सोनई व त्यांचे मित्र नाव माहीत नाही अशा ९ जणांविरुद्ध
भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३२७ आर्म अक्ट ४२५ प्रमाणे गुरन, २१८ दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सपोनि देशमाने यांनी भेट दिली. पुढील तपास आव्हाड हे करीत आहेत.
- तुमच्याही तळहातावर ‘अशा पद्धती’ची खूण आहे का? जर असेल तर या वयापर्यंत व्हाल तुम्ही श्रीमंत, वाचा माहिती
- शेळीपालन व्यवसायात कमी कालावधीत कमवायचा असेल पैसा तर पाळा ‘या’ शेळ्यांच्या जाती! कमी कालावधीत व्हाल श्रीमंत
- घटस्फोटानंतर पती-पत्नीचे काय असतात अधिकार? प्रॉपर्टीची वाटणी दोघांमध्ये कशी केली जाते? काय म्हणतो कायदा?
- पुणे रिंगरोड भूसंपादनाबाबत खेड व हवेली तालुक्यातील ‘या’ गावांच्या शेतकऱ्यांना लागली लॉटरी! भूसंपादनाचा पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा
- सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये काही बदल झाल्यास तात्काळ कळेल तुम्हाला माहिती! भूमी अभिलेख विभाग आणणार ‘ही’ सुविधा