त्या निर्णयाविरोधात नाभिक समाज संघर्षाच्या तयारीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  31 मे रोजी शासनाने महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सलून व्यवसाय सुरु ठेवण्याची विनंती केली आहे.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचया कालावधीमध्ये शासनाचया सर्व नियम अटींचे पालन करत असतांना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सलून चालकांवर उपासमारीची वेळ असतांना सुद्धा आपले व्यवसाय बंद ठेवून शासनास सर्वोतोपरि सहकार्य केले.

22 मे पासून राज्यात काही ठिकाणी सलून व्यवसायिकास परवानगी मिळाली, असे असतांना शासनाने घालून दिलेल्या नियम अटींसह व्यवसायिक आपली व्यवसाय करत असतांना दि.31 मे रोजी शासनाने सलून व्यवसाय महाराष्ट्रात पूर्णपणे बंद राहतील, असे जाहीर केल्यामुळे व्यवसायिक भयभीत झाला असून, मोठे उपासमारीचे संकट सलून व्यवसायिकांसमोर उभे ठाकले आहे.

आतापर्यंत शासनाकडे वेळोवेळी नाभि समाजाला मदतीची अपेक्षा केली असतांना दुर्लक्ष केले आहे. कर्नाटक सरकारने 5 हजार रुपयांची मदत देण्याचे घोषित केलेले आहे. महाराष्ट्रातही सलून व्यवसायिकास महिना 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य तसेच लाईटबील माफ करावे, प्रत्येक व्यवसायिकाचा आरोग्य विमा करावा, अशी विनंती पुन्हा एकदा शासनास करण्यात येत आहे.

आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास नाभिक समाज येणार्‍या काळात आपल्या हक्कासाठी न्यायिक मार्गाने या घटनेचा तीव्र निषेध करेल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आपल्या न्यायिक हक्कासाठी सरकार विरोधात तीव्र लढा उभा करील.उपासमारी चालू असलेला समाज आपल्या हक्कासाठी वेळप्रसंगी मोठ्या संख्येने आमरण उपोषण करेल. असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, सुनिल वाघमारे, विकास मदने, सुनिल खंडागळे, किशोर मोरे, जनार्दन वाघ, चंद्रकांत बिडवे, शिवाजी दळवी, सुनिल वाघमारे, सुरेश राऊत, शरद दळवी, अनिल कदम, बापू क्षीरसागर, बाळासाहेब शेजूळ, प्रमोद शेजूळ, मनोज शिंदे, संजय भुजबळ, संजय शिंदे, अजय कदम आदिंच्या सह्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment