कागदावरच्या परीक्षा होताच राहतात! ठाकरे सरकाराच्या निर्णयावर मंत्री तनपुरे म्हणतात…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

या निर्णयानंतर तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन संबोधित करताना म्हटले की,  

तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण  या कागदावरच्या परीक्षा होत राहतील. मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात.

आता एका नैसर्गिक परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे, पण कठीण नाही. पुढे येणा-या सर्व संकटांना सामोरे जाण्याचा धडा यातून आपल्याला मिळणार आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरचा काळ मला माझ्या अंतिम परीक्षेसारखा वाटला.  या दरम्यान शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते. कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते.

अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते. या सगळ्यांत निर्णय घेणे कठीण गोष्ट होती. कारण विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्य या दोन्हींची चिंता लागून राहिली होती.

त्यामुळे सरकाराच्या या निर्णयानंतर  मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया तनपुरे यांनी यावेळी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment