अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे रविवारी मध्यरात्री बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा फडशा पडला. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याबाबत माहिती अशी: रविवारी शेळकेवाडी येथील जयेश काशिनाथ शेळके यांच्या गोठ्यातील गायी व शेळ्यांवर बिबट्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हल्ला केला.

शेळ्यांच्या ओरडण्याने शेळके यांना जाग आली. बॅटरी चमकविल्याने बिबट्याने धूम ठोकली. यामध्ये ३ शेळ्यांचा मृत्यू झाला.
वनपाल रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे दिलीप बहिरट, सविता थोरात, दीपक वायळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या ठश्यावरून दोन बिबटे असल्याचे त्यांनी सांगितले.
या आधीही बिबट्याने परिसरात हल्ला चढवला होता. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews