अहमदनगर :- शहरात रुग्णालयातही महिला, मुली सरक्षित नसल्याचे उघड झाले आहे सिव्हील हॉस्पिटलमध्ये १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
सदर अल्पवयीन तरुणी जेवणाची डबे धुण्यासाठी बेसिनजवळ जात असताना व खरकटे पाणी टाकण्यासाठी जात असताना सिव्हील हॉस्पिटलमध्ये असणारा वॉर्डबॉय आरोपी प्रदीप गुंड याने सदर मुलीला नको तेथे हात लावून विनयभंग केला.
व पिडीत मुलगी गादीवर झोपलेली असताना आरोपी वॉर्ड बॉय प्रदीप गुंड तेथे आला व मुलीच्या अंगावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.
मुलीने जोरजोराने आरडाओरड केला असता आरोपी प्रदीप गुंड हा पळून गेला.
मुलीच्या वडिलांनी झाल्याप्रकरणी जाब विचारला, त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी वॉर्डबॉय प्रदीप गुंड याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू
- मुंबई ते दिल्ली तब्बल 130 Kmph वेग ! अशी आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
- नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!