योनीमार्गात खाज येतीये? ही असू शकतात कारण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  योनीमध्ये जर खाज येत असलेल्या ठिकाणी लालसरपणा आला असेल तर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसची समस्या असू शकते. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.

कारण त्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. ही खाज येण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. जाणून घेऊयात त्याबाबद्दल माहिती. योनीमार्गात बॅक्टेरिया असतात.

अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर, गर्भवती असाल किंवा हार्मोन थेरेपी घेत असाल तर शरीरात एस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि चांगल्या बॅक्टेरियांपेक्षा वाईट बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं.

यामुळे यीस्ट इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे योनीमार्गात खाज येते. कंडोम, साबण, सॅनिटरी नॅपकिनची अॅलर्जी, घट्ट अंडरवेअर वापरणं आणि भरपूर वेळ सायकल चालवणं यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

बॅक्टेरिअल व्हेजिनोसिस हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. ज्यामध्ये व्हजायनातील गूड आणि बॅड बॅक्टेरियांचं संतुलन बिघडतं. यावेळी जननांगात खाजेसह सफेद रंगाचा स्रावही येतो.

लघवी करताना जळजळ होते. असुरक्षित सेक्स, योनीत स्टिमिंग यामुळे हे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.बॅक्टेरिअल व्हेजिनोसिस हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे.

ज्यामध्ये व्हजायनातील गूड आणि बॅड बॅक्टेरियांचं संतुलन बिघडतं. सेक्स हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतरही व्हजायनामध्ये खाज येऊ शकते. मासिक पाळीदरम्यान आणि मेनोपॉजवेळीदेखील ही समस्या उद्भवते.

प्युबिक एरियातील केस काढल्यानेही त्वचा लालसर होते आणि तिथं खाज येते. शरीराच्या या भागावर वॅक्सिंग करण्यापूर्वी तुम्हाल वॅक्सची अॅलर्जी तर नाही ना हे तपासून घ्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment