नेवासा :- तालुक्यातील चारी नं. चार सोनई परिसरात पानसवाडी रस्ता भागात राहणारी शेतकरी महिला अश्विनी सोमनाथ तागड, वय ३० हिला ९ जणांनी जमाव जमवून आमच्याविरुद्ध सोनई पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे या कारणावरुन शिवीगाळ करत चाकू, गुप्ती, काठीने वार करुन तलवारीचा धाक दाखवून बेदम मारहाण केली.
आरोपी महिला सुप्रिया रविंद्र गडाख हिने अश्विनी तागड या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण बळजबरीने काढून नेले.
जखमी अश्विनी सोमनाथ तागड या विवाहित तरुणीने सोनई पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी भाऊसाहेब पोपट गडाख, दीपक भाऊसाहेब गडाख, विद्र भाऊसाहेब गडाख, सुप्रिया रविंद्र गडाख, काशीनाथ यशवंत गडाख, शिवाजी काशिनाथ गडाख , राहुल पद्माकर दरंदले , सर्व रा. सोनई व त्यांचे मित्र नाव माहीत नाही अशा ९ जणांविरुद्ध
भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३२७ आर्म अक्ट ४२५ प्रमाणे गुरन, २१८ दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सपोनि देशमाने यांनी भेट दिली. पुढील तपास आव्हाड हे करीत आहेत.
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !
- Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल
- गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती
- FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…
- नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना