आनंदाची बातमी : आता नगर – पुणे रस्त्यावर वाहतूककोंडी नसेल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : नेहमी वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याची प्रलंबित कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. 

नगर पुणे रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी  वाघोली ते शिक्रापूर – २४.७० किमीत  हायब्रीड अन्युईटी  हा प्रकल्प हाती घेतला आहे.

यात चौपदरीकरणाचे सहापदरीकरण करणे, २२ ठिकाणी ओंढ्यावरील मोऱ्यांची कामे तसेच दोन छोट्या पुलांची दुरुस्तीची कामे होणार आहे. अपघात टाळण्यासाठी या कामादरम्यान दुभाजकाची उंची चार फुटापर्यंत वाढविण्यात येणार असून

आवश्यक तेथे चार फूट उंचीचे दुभाजक बसवण्यात येणार आहेत.  तसेच वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी  थर्मो प्लास्टिक पॅन्टच्या रबलींग स्ट्रीप, कॅट आईज, रिफ्लेक्टरही बसवण्यात येणार आहेत.

संबधित ठेकेदाराकडून रस्ता डांबरीकरण, दुभाजकाची  रंगरंगोटी,  रुंदीकरण आदि  कामे सुरु आहेत. अधीक्षक अभियंता मिलिंद बारभाई, सहाय्यक अभियंता उज्वला घावटे, शाखा अभियंता एन. जे. शेळके यांनी पाहणी करून प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जवळपास बाराशे अतिक्रमणधारकांना नोटीसा दिल्या असून, वाघोलीत अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमणे काढली आहेत. इतर अतिक्रमणधारकांनीही अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment