दुचाकी चोरीच्या पैशातून गोव्याला जाऊन एन्जॉय करणारी टोळी गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.

त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे.

पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 मे रोजी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास केली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

शहरात व उपनगरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरात व उपनगरात चोरी करणारी टोळी जेरबंद केली.

या चोरट्यांनी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न कार्य समारंभासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्या लंपास करतात.

कागदपत्र नंतर देण्याच्या बोलीवर ते गाड्या विकत. या विक्रीतून आलेल्या पैशातून ते गोव्याला जाऊन एन्जॉय करत असल्याचे या चोरीच्या घटनांमधून उघड झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment