पूरस्थिती निर्माण होण्यापुर्वी शहरातील सिना नदी पात्रासह ओढे-नाल्यांची सफाई करावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :  शहरात मान्सून सक्रीय होऊन मोठ्या पावसाची सुरुवात झाली आहे. जून महिना सुरु झाला असला तरी अद्यापि शहरातील सिना नदी पात्रासह शहरातील ओढे-नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही.

सदर प्रश्‍नी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना निवेदन देऊन शहरातील सिना नदी पात्रासह ओढे-नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याचे निवेदन दिले.

तसेच सदर प्रश्‍न मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, गिरीश जाधव, नगरसेवक निलेश भाकरे, दत्ता जाधव, मदन आढाव, काका शेळके, मनिष गुगळे, विशाल वाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावर्षी मान्सून लवकरच सक्रीय झाले असून, त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने सिना पात्राची अद्यापि साफ-सफाई पुर्ण केलेली नाही. काही दिवसांपुर्वी सुरु झालेले सिना पात्राच्या सफाईचे काम बंद पडले आहे.

कोरोनाच्या नावाखाली नागरिकांच्या इतर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील सिना पात्रासह प्रमुख ओढ्या-नाल्यांची सफाई झालेली नाही. शहरात पाऊसाचे आगमन झाले असून, मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मागील वर्षी सिना पात्रालगत असलेल्या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. सिना पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचून झाडे-झुडपे वाढली आहे.

सिना पात्राची सफाई न केल्यास पाऊसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होऊन परिणामी पूरस्थिती पुन्हा उद्भवणार आहे. यामुळे नालेगाव, काटवन खंडोबा रोड, वारुळाचा मारुती, नगर-कल्याण रोड येथील घरांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. शहरात पुरस्थिती निर्माण झाल्यास याला मनपा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment