अहमदनगर :- दिल्लीतून मंत्रीपदासाठी सिग्नल मिळत नसल्याने काँग्रेस सोडणारे राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे.
थेट दिल्ल्लीतूनच विरोध झाल्याने भाजप सरकार मध्ये मंत्रीपदाचे स्वप्न पहाणार्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वप्नावर तूर्तास तर पाणी पडले आहे.

लोकसभेच्या निकालानंतर माजी विरोधी पक्षनेते विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
विखेंचा भाजप प्रवेशाबाबत प्रदेश भाजपला सूचना देतानाच त्यांचा एवढ्यात मंत्रिमंडळात समावेश करू नका, अशी सूचना दिली आहे.
विखे यांचा मंत्रिमंडळात होत नसलेला समावेश मात्र विखे समर्थकांसाठी डोकेदुखी वाढणारा ठरणार आहे.
विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असताना दुसरीकडे काँग्रेसमधील त्यांचे विरोधक असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे.
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी अधिकृतरीत्या अद्याप भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांचे बसणे उठणे हे भाजपच्या नेत्या बरोबर सुरू झालेले आहे.
विखे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत दिल्लीतून ब्रेक लागल्याने भाजप प्रदेश ने सध्या विखे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत मौन पाळले आहे.
- मेंदूवर हल्ला करणारा किडा, पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं टाळाच! जाणून घ्या याची लक्षणे
- जगातील नास्तिक देशांची यादी समोर! धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या यादीत भारत पुढे की मागे? पाहा आकडेवारी
- चेरापुंजी नव्हे ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण! 90% लोकांना माहित नसेल या गावाचं नाव आणि ठिकाण
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 24 जुलैपासून ‘या’ शहरातून तिरुपतीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
- श्रीसंत ते सुशील कुमार…गुन्हे आणि जेलवारीमुळे बदनाम झाले ‘हे’ 5 खेळाडू! एकावर तर हत्येचाही आरोप