‘त्या’ महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांना घरातच केले क्वारंटाईन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : पुणेवाडी येथील २८ वर्षीय कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ७ नातेवाईकांना गुरुवारी रात्री उशिरा माघारी पाठवण्यात आले.

त्या सर्वांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोना सदृश्य कोणतीही लक्षण आढळून आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्याच घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या दरम्यान जर काही लक्षणे आढळून आली तर त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात येतील असे डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

सहकारी बँकेत नोकरीस असलेला तरुण व त्याची पत्नी १ जून रोजी टँकरने पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथे व तेथून दुचाकीवर पुणेवाडी येथे आले व थेट संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले.

त्यांचा कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क आला नसल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्या तपासणीत त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाही.

त्यामुळेच तरुणाचे आई, वडील, भाऊ, भावजय, चुलते, एक मुलगी तसेच पारनेर येथील मेहुण्यास प्रशासनाने ताब्यात घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment