अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला.
याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात यासाठी समितीही स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये गावच्या सरपंचाचा सुद्धा समावेश आहे.
मात्र, ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करताना वाद उद्भवू लागले असून मारहाणीचे प्रकारही घडू लागले आहेत. कर्जत पोलिस स्टेशनला देखील असाच एक गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील महिला सरपंच व त्यांच्या पतीला दोन जणांनी भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे मारहाण केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews