कुकडी पाणीप्रश्न चिघळण्याची चिन्हे : श्रीगोंद्यात शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन !

Published on -

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कुकडीचे आवर्तन दि.७ पासून सुरू झाले, असे असतानाच कुकडी पाणीप्रश्नी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कायम अन्याय होत असून, टेल टू हेडच्या नियमात श्रीगोंदयातील शेतकरी मात्र नेहमीच भरडला जात आहे.

त्यामुळे खालच्या भागात किती दिवस पाणी जाणार श्रीगोंदयाला पाणी कधी मिळणार याबाबत कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व नियोजन करून माहिती द्यावी व कुकडीच्या पाण्याबाबत होणारा अन्याय टाळून श्रीगोंदयातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे.

या मागणी साठी शेतकरी बचाव कृती समितीचे सर्व तरुण शेतकरी दि.८रोजीदुपारी पाण्यात जलसमाधी आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी संबंधित खात्याना निवेदन दिलेले आहे,

श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून या आंदोलकांना जमाव बंदी आदेश लागू असून, इतर कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे जलसमाधी आंदोलन करू नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

असे पत्र देऊन सूचना देण्यात आलेली आहे. असे असले तरी दि.८ रोजी हे जलसमाधी आंदोलन आपण करणारच या मतावर शेतकरी बचाव कृती समितीचे सर्व सदस्य ठाम आहेत. त्यामुळे कुकडी पाणीप्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News