महसूल मंत्री थोरात यांच्याकडून शहर युवक काँग्रेसच्या कार्याचे कौतुक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नगर शहरात शासकीय विश्रामगृह येथे आले होते यावेळी अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी सत्यजित तांबे यांच्या सूचनप्रमाणे केलेल्या युवक काँग्रेसने विविध कामाची माहिती मंत्री थोरात यांना दिली

त्यामध्ये अहमदनगर कॉलेज हॉस्टेलमधील नागालँड च्या शंभर विद्यार्थ्यांची केलेली व्यवस्था, एमआयडीसीमधील आसामच्या कामगारांच्या सोडवलेल्या अडचणी , पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप, रक्तदान शिबिर व फेसबुक लाईव्ह द्वारे सुरु असलेला थेट-भेट हा कार्यक्रम अशा अनेक कामाचा समावेश होता

यावेळी मयूर पाटोळे व त्यांच्या टीमला शाबासकी देत नामदार थोरात यांनी युवक काँग्रेसच्या कामाचे कौतुक केले. यावेळी काँग्रेसचे शहरजिल्हा अध्यक्ष दिप चव्हाण व शहर काँग्रेस नेते किरण काळे देखील उपस्थित होते यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन युवक काँग्रेसला लाभत आहे असे मयूर पाटोळे यांनी सांगितले .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment