अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेला विविध प्रकारे काळजी घेण्यासाठी प्रशासन सूचना देत असताना आमदार निलेश लंके यांच्याकडून मात्र सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडवला आहे.
आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व कै.विक्रमराव शेवाळे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नवनागापूर येथील नागरिकांना होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते नागरिकांना होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.प्रमोद लंके, बाबासाहेब शेवाळे उपस्थित होते.
होमिओपॅथी तज्ञ डॉ.प्रमोद लंके यांनी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक गोळ्यांची माहिती दिली. तर रोग प्रतिकारशक्ती वाढविणे व कोरोनाच्या बचावासाठी उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी परिसरातील नागरिकांनी या गोळ्या घेण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान शासनाने गर्दी करू नये, दोन व्यक्तीत अंतर राखणे, मास्क वापरणे आदी नियमांचे पालन केले गेले नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews