अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : नर्तिकेच्या बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने एकाच्या ताब्यातून सोडवून स्नेहालयात पाठवले, याचा राग येऊन पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अॅट्रोसिटी व विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.
याबाबत नर्तिकेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, आपल्या बहिणीच्या मुलीची शहारुख अन्सार शेख व अन्य व्यक्तींच्या ताब्यातून पोलिसात तक्रार देऊन सुटका केली.
पोलिसांनी तिला स्नेहालयात पाठवले. त्याचा राग मनात धरून ५ मे रोजी शहारुख अन्सार शेख, काद्या ऊर्फ अरबाज अन्सार शेख, सरफराज ऊर्फ लड्या, अन्सार शेख, शबाना अन्सार शेख व इतर १०-१५ अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आले.
आपणास व मुलीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने श्रीरामपूर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आदेश पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हा दाखल झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews