कोरोना रुग्ण आढळून आल्याने ‘हा’ भाग कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित

Published on -

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द व प्रवरानगर येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने हा भाग कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.

कारखाना रोडच्या पूर्वेचे पंचवटी क्षेत्र, शांतीनाथ मंगल कार्यालय परिसर, आहेर वस्ती, पाथरे रोड व कोल्हार बुद्रूक गावातील प्रवरानगर पंचवटी भागात नागरिक व वाहनांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध लावण्यात आले.

पाथरे रोड हे ठिकाण प्रवेश व बाहेर जाण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. तहसीलदार कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने २० जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. आवश्यक गरजांची पूर्तता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News