मनपा स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनपा स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांना काल सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

सर्जेपुरा परिसरात आरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या दोन गटांमध्ये महापालिका निवडणूक वादातून हाणामारी झाली होती.

या गुन्ह्यात मुदस्सर शेख यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख फरार होते.

काल सायंकाळच्या सुमारास स्वत:हून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी शेख यांच्या अटकेची कारवाई केली आहे.

नगरसेवक मुदस्सर शेख महापालिका निवडणुकीत निवडून आले होते, त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक आरिफ शेख पराभव केला होता.

या पराभवाच्या वादातून आरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या गटांमध्ये लोखंडी गज, लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाली होती.

तसेच जोरदार दगडफेक झाली होती. सर्जेपुरा परिसरात एक महिन्यापूर्वी ही घटना घडली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment