अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संकटात अहमदनगर जिल्ह्यात आज दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही व सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच आज जिल्ह्यातील आणखी ०५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतल्या आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये अकोले, शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक तर नगर महापालिका क्षेत्रातील ०२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४१ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
दरम्यान अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये केलेल्या तपासणीत आज २६ व्यक्तीचे घशातील स्त्राव तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये कोपरगाव १८, नगर शहर ०६, शेवगाव ०१ आणि नगर तालुका ०१ असे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी ही माहिती दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews