कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आज 6 कोरोना रुग्ण वाढले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव केसेस ६० झाल्या आहेत.

आज जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब मध्ये सकाळी एक व्यकी पॉझिटिव्ह आढळून आला.

तसेच संगमनेर येथील ०४ रुग्ण आणि नगर शहरातील कायनेटिक चौक येथील एक रुग्ण खाजगी प्रयोगशाळेने केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यात संगमनेर येथील चार पैकी एक जण निमोन येथील आहे. नगर शहरात पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला ही एका खाजगी रुग्णालयात काम करते.त्यांचाही समावेश जिल्हा रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

जिल्हयातील बरे झालेले रुग्ण १६१

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३२
*मृत्यू – ११

(महानगरपालिका क्षेत्र ५०, अहमदनगर जिल्हा १२१, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)

एकूण स्त्राव तपासणी  ३१४१

निगेटीव  २८६५    रिजेक्टेड  २७  निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी ०९

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment