अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शिर्डी सोकसभा सह अहमदनगर जिल्ह्यासाठी आणि त्यातही संगमनेर-अकोलेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्गाला नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने खा. लोखंडेच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाल्याची माहिती अकोले नगरपंचायत चे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी दिली.
श्री.मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि या रेल्वे मार्गाची एकुण लांबी 231.67 कि.मी. असून, पैकी 180 कि.मी. चे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. तर उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खा.लोखंडे यांनी मा.रेल्वे मंत्री ना. सुरेशराव प्रभु, विद्यमान रेल्वे मंत्री ना. पियुषजी गोयल यांना सातत्याने भेटुन, संसदेत या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवुन पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लावल्याने त्यांचेवर मतदार संघासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खा. लोखंडे यांनी शिर्डीच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून शिर्डी शताब्दीच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून शिर्डीच्या विकासासाठी पाठपुरावाही सुरू केला असल्याची माहितीचा दिली. खा. लोखंडे यांनी अशा अनेक विकासात्मक कामांची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी देखील खा. लोखंडे यांचे कौतुक केले.
पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे मार्गासाठी जे खा.लोखंडे आग्रही आहेत, तसेच शहापुर-शिर्डी या रेल्वे मार्गासाठीही प्रयत्नशिल असल्याचे म्हणत, त्यांनी सांगितले कि अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी देखील एक पंचवार्षिक विकास आराखडा तयार करून विकासाला दिशा देण्यासाठी खा. लोखंडे प्रयत्नशिल आहेत.पत्रकावर तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, प्रदिप हासे, महेश नवले, संतोष मुतडक यांच्या नावाचा उल्लेख आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews