श्रीगोंदा – घोड कुकडी प्रश्नी राजकीय हस्तक्षेप नको म्हणणाऱ्या आमदार राहुल जगताप यांना योग्य अभ्यास व माहिती घेण्याची आवश्यकता असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांनी कुकडी प्रश्नी हस्तक्षेप केला नसता तर मागील आवर्तन मिळाले असते का? आ. जगताप यांनी अभ्यासपूर्ण वक्तव्य करावे, असे ही भाजप नेत्यांनी म्हटले आहे.


खेतमाळीस, काकडे व नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गप्प बसून पाणी मिळत नाही.
त्यासाठी भांडावे लागते, बोलावे लागते, हस्तक्षेप करावा लागतो.
मागे एका बैठकीसाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते गैरहजर असल्याने पाणी सुटण्यास उशीर झाला. शेवटी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना विनंती केल्याने पाणी सुटले.
कडाके वाजवून, जागरण गोंधळ करून, चाऱ्यात मुक्काम करून, वेल्डिंग तोडून स्टंटबाजी करून पाणी मिळत नाही.
त्यासाठी अभ्यासपूर्ण मत योग्य ठिकाणी मांडावे लागते. हे जबाबदारी लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतले पाहिजे.
राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावनांशी खेळ केला. स्वतःला पद मिळाले.
मात्र, शेतकऱ्यांचे गेल्या पाच वर्षात झालेल्या लाखो रुपये नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? हे ही आ.जगतापांनी जाहीर करावे. असे काकडे, खेतमाळीस व नागवडे म्हणाले.
- तुम्हीही थेट गॅसवर पोळ्या भाजून खाताय?, या सवयीने वाढतो कॅन्सरचा धोका! आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा
- श्रावणातील प्रत्येक शनिवारी करा ‘ही’ खास पूजा, शनिदेवाचा कोप शांत होऊन बरसेल कृपादृष्टी!
- शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत खा. नीलेश लंके यांच्या पत्राची दखल
- महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
- SBI, HDFC सह सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आरबीआयकडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर !