अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : आज जिल्ह्यातील आणखी ०६ व्यक्ती कोरोनातुन बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यापैकी ०५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला.
यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मण गल्ली, माळीवाडा येथील ०३, श्रीरामपूर ०१, आणि संगमनेर येथील एक अशा ०५ व्यक्तींना बूथ हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले.
येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप देत पुढील चांगल्या आरोग्यासठी सदिच्छा दिल्या. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६७ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews