अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : बाह्यवळण रस्त्यावरील केडगाव-अकोळनेर चौकात ट्रक आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली.
तर, दुसरी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी 10 च्या सुमारास घडली. या दोघी सख्ख्या बहिणी असून, केडगाव येथील रहिवासी आहेत.
या अपघातात मनीषा बाळासाहेब कापरे (वय 35, रा. कापरेमळा, कांबळे मळा, केडगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेखा प्रशांत चव्हाण (वय 32, रा. भूषणनगर, केडगाव) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोघी गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्लेझर (क्र.एमएच 16 एएल 8352) या दुचाकीवरून केडगावहून अकोळनेरच्या दिशेने जात होत्या.
त्यावेळेस बाह्यवळण रस्त्यावरील चौकात सोलापूर महामार्गावरून येणारी ट्रक (टीएन 52 एफ 6085) आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
या अपघातामध्ये मनीषा कापरे जागीच ठार झाल्या. त्यांची बहीण रेखा या गंभीर जखमी झाल्या. या रस्त्याने जाणार्या प्रवाशांनी जखमी रेखा चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगरला खासगी रुणालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews