अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपली पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यास सुरूवात केली आहे.दिवसागणिक रूग्णांची वाढती संख्या हे त्याचेच घोतक आहे.
जिल्हा रुग्णालयातून काल शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी १० जणांची भर पडली.
सर्वात जास्त बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. त्यामुळे कोरोनाची संख्या २४९ झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १८६ झाली आहे.
या बाधितामध्ये संगमनेर येथील ७३ वर्षीय व्यक्ती. ही व्यक्ती नाशिकहून प्रवास करून आली होती. याशिवाय, नगर शहरातील सारसनगर येथील ५८ वर्षीय व्यक्तीला लागण. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील ही व्यक्ती.
तसेच गजानन कॉलनी एमआयडीसी येथील काल बाधित आलेल्या व्यक्तीची पत्नीही आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.
पाच बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश.
संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलाही बाधित. खाजगी प्रयोगशाळेत दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
यात एक ६५ वर्षीय पुरुष तर ३२ वर्षीय महिलेचा समावेश. दोघे जण संगमनेर शहरातील.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्या अखेरीस बंधनात काही प्रमाणात सूट देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
शासन-प्रशासन नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनेची दक्षता घेण्याचे आवाहन नियमीत करीत आहेत. मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येचा चढता क्रम सुरूच आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews