अ‍ॅक्टर व्हायचे असेल तर अगोदर आपले शिक्षण पूर्ण करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून थेट-भेट फेसबुक लाईव्ह मुलाखतींचा हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या फेसबुक लाईव्ह मुलाखती घेतल्या जात आहे.

याअंतर्गत मुळ नगरची असलेली अर्शीन मेहता हिची मुलाखात घेण्यात आली. तीने नगरच्या युवकांशी संवाद साधताना अ‍ॅक्ट्रेस व्हायचे असेल तर अगोदर आपले शिक्षण पूर्ण करा असा सल्ला युवकांना दिला आहे.

बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस अर्शिन मेहताला मुलाखती दरम्यान अनेक प्रश्न केले गेले. अर्शीन ने नवीन पिढी ज्यांना बॉलिवूडमध्ये जाण्याचे चांगलेच आकर्षण असते त्यांनी प्रथम अभ्यासावर लक्ष द्यावे शिक्षण पूर्ण करावे मग ऍक्टिंग कडे वळावे असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

आर्शिन ही स्वत: सीए आहे व त्यानंतर ती अ‍ॅक्ट्रेस बनली. अर्शीनला अनेक गमतीशीर प्रश्न देखील केले गेले त्याध्या तिने सांगितले नगरचे स्वीट होम हॉटेल मध्य जेवायला फार आवडते.

मी नगरची आहे हे मी बॉलिवूडमध्ये अभिमानाने सांगते. तसेच तिने या मुलाखतीत बॉलिवूडचे अनेक गमतीशीर आठवणींना उजाळा दिला. अहमदनगर शहर युवक काँग्रेसचा थेट भेट फेसबुक लाइव्ह हा कार्यक्रम सध्या नगरकरांमध्ये फार गाजतोय म्हणूनच नगरकरांची संवाद साधण्यासाठी मी आज या माध्यमातून आले आहे असे अर्शीनने आवर्जून सांगितले.

अभिनेत्री अर्शीन हिची मुलाखत युवकचे शहर अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी घेतली. या दरम्यान युवक काँग्रेसचे अन्वर सय्यद, योगेश काळे, मुबीन शेख, साहिल सादिक, सुजय गांधी, अमन तिवारी, दिपक धाडगे आदींचे सहकार्य राहिले असून शहर काँग्रेसचे किरण काळे व सोशल मीडिया टेक्निकल टीमचे वैभव लोहार, योगेश दिवाणे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

या उपक्रमात युवक काँग्रेसमार्फत नगरचे तहसीलदार उमेश पाटील, माजी महापौर व काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, उद्योजक अशोक सोनवणे, सतीश लोटके, हर्जित सिंह वाध्वा, चौपाटी कढी वड्याचे अमोल सूर्से व अर्शीन मेहता आदींच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment