अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील महादेव देवस्थान परिसरातील स्मशानभूमी समोर पांदन क्षेत्रामधील ओढ्यात अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते, त्यामध्ये माशाऐवजी ६ ते ७ फूट लांबी असलेले २५ ते ३० विरूळे जातीचे साप अडकून मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी घडली.
तालुक्यातील वडाळा महादेव मंदिर परिसरातील स्मशानभूमीसमोर पांदण व ओढ्याचा परिसर आहे. या भागात जंगली गवत, झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर असून मानवी वर्दळीचा नाही.
या भागात छोटा ओढा असून थोड्याफार प्रमाणात पाणी वहात असते. याच ओढ्यात छोटे मासे पकडण्यासाठी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळे लावले होते. मात्र, या जाळ्यात साप अडकण्याऐवजी २५ ते ३० विरूळे जातीचे सापच अडकले.
त्यांचा जाळ्यातच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी काय मेले हे पाहिले असता जाळ्यात साप दिसले.
परिसरामध्ये मृत सर्पाबद्दल माहिती वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल विकास पवार यांना घटनेची माहिती कळवली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी तत्काळ येऊन पाहणी केली.
वरिष्ठ अधिकारी यांना घटनेची माहिती कळवली. वनविभागाचे अधिकारी यांनी मृत सर्पाबद्दल शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना माहिती देण्यास सांगितले. सापांचे शवविच्छेदन करण्याचे ठरवले.
त्यानुसार दोन साप शवविच्छेदन करण्यासाठी वनक्षेत्रपाल विकास पवार यांनी ताब्यात घेतले. सापांची आजकाल तस्करीही होत आहे. त्यातला हा प्रकार आहे का?
म्हणून श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसूद खान, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, पोलिस हेडकाॅन्स्टेबल अतुल लोटके यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृत सापांच्या शरीराची दुर्गंधी येत असल्याने जेसीबीच्या साहाय्याने खड्डा घेऊन त्यांचे दफन करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews