नागरिक स्वत:चीच काळजी घेणार नसतील तर कोरोनाला आळा कसा बसेल ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार जनतेची काळजी घेत आहे. तोंडाला मास्क बांधा, गर्दीत जाऊ नका, अशा सूचना देत गाव पातळीपासून देशपातळी पर्यंत सरकारी यंत्रणा सज्ज आहे.

मात्र नागरिक जगण्याची पर्वा नसल्यासारखे वागत असतील व ते स्वत:चीच काळजी घेणार नसतील तर कोरोनाला आळा कसा बसेल ? अन् सरकार तरी काय करेल, असा सवाल शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके यांनी केला आहे.

सरकारला जनतेचे आरोग्य निरोगी रहावे म्हणून कोरोनाच्या महामारीत सरकारी यंत्रणा वारंवार देश बंद ठेवून त्यावर उपाययोजना आखत आहे.

नागरिक शासन आदेश पाळत नाहीत, त्यामुहे कोरोनाला कसा आळा बसेल. नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास कोरोना हाद्दपार होवू शकतो. त्यासाठी वेळीच शहाणे होणे गरजेचे आहे, असेही शेळके म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment