महिला शिक्षकेस व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करत विनयभंग !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :   कोपरगाव | महिलेच्या व्हॉट्‌सअॅप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून अश्लील व्हीडीओ, अश्लील फोटो, व्हॉईस मेसेज, व्हीडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित शिक्षित महिलेने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार विविध मोबाइल नंबरवरून फोन करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

९ जून रोजी रात्री अकरा वाजेनंतर ते १२ जून रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांचे सुमारास आरोपीने फिंर्यादी महिलेच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर वारंवार व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करत विनयभंग केला.

कोपरगाव शहर पोलिसात १२ रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्याद देण्यात आली होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment