अहमदनगर :- व्याजासह मुद्दल देऊनही पैशासाठी तगादा सुरू असल्याने वैतागलेल्या कर्जदाराने दुकानदाराच्या डोक्यात वार करत खून केला.
गुरुवारी रात्री दहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील पाईपलाईन रोडकडे जाणाऱ्या चौकात ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
योगेश बाळासाहेब इथापे हे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आरोपी कृष्णा रघुनाथ गायकवाड हा स्वतःहून तोफखानाा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, गायकवाड व इथापे या दोघांचे नगर-मनमाड रस्त्यालगत शेजारीशेजारी दुकान आहे. इथापे यांच्याकडून गायकवाड याने व्याजाने पैसे घेतले होते.
गायकवाड याने इथापे यांना मुद्दल व व्याज दिले होते. तरीही इथापे यांच्याकडून पैशासाठी वारंवार तगादा लावला जात होता.
सततच्या त्रासाला कंटाळून आज रात्री दहा वाजता दोघांत कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या गायकवाड याने इथापे यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारून गंभीर जखमी केले.
डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने गंभीर जखमी इथापे हे बेशुद्धध पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
परंतु उपचारादरम्यान साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले.
इथापे यांच्या डोक्यात टणक बसून मारल्यानंतर कृष्णा गायकवाड हा स्वतःहून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाला.
पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘
- सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त
- 1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू