सोशल मिडीयावरील मराठा समाजातील मुलींची बदनामी थांबवा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  समाजमाध्यमांवर होणारी मराठा मुलींची बदनामी थांबवा, या मागणीचे निवेदन जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील महिला व मुलींबद्दल गलिच्छ भाषा वापरून बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड खूनप्रकरणी आरोपींना शासन होण्यासाठी मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने विरोध केलेला नाही. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.

असे असताना काही समाजकंटक सोशल मीडिया व टीकटॉकवर व्हिडीओ बनवून मराठा समाजातील मुलींची बदनामी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही समाजकंटक जातीय रंग देऊन अत्यंत भडक व चिथावणीखोर पोस्टर व्हायरल करत आहेत. मराठा समाजातील मुलांबद्दल अत्यंत खालच्या थराला जाऊन बदनामी करण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजाची भूमिका मांडणाऱ्या तरुणांना अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

कायद्याचा गैरवापर करून मराठा समाजाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया व टीकटॉकद्वारे व्हिडीओ तयार करून मराठा समाजाची व मुलींची बदनामी करणाऱ्या विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा;

अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे मंगेश आजबे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment