वीज काेसळल्याने झाडाच्या फांदीचे झाले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारातील पेपर मिलच्या पूर्वेस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतील बांधावर असलेल्सा शिसमच्या झाडावर सोमवारी दुपारी वीज कोसळली.

झाडाच्या फांद्या पन्नास फुटांवर उडून पडल्या. कोळपेवाडी परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता.

सोमवार दुपारी कोळपेवाडी परिसरात आभाळ दाटून आले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटाने कोळपेवाडी परिसर हादरला.

विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वीज पडल्याच्या भीतीने नागरिक भयभीत झाले. वीज कुठे पडली,

याच शोध घेतला असता पेपर मिलच्या पूर्वेस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतील सात आंब्यांच्या शेजारील शिसमच्या झाडावर वीज कोसळल्याचे आढळले.

फांद्या दुभंगून दूर जाऊन पडल्या होत्या. कोळपेवाडीच्या दक्षिण बाजूस पाऊस पडला. कोळपेवाडीचा बहुतांशी भाग कोरडाच होता. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe