बहिणीची अशीही माया: तिने बिबट्याच्या तावडीतून केली भावाची सुटका !

Published on -

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : वेड्या बहिणीची वेडी माया अशी मराठीत एक म्हन आहे. म्हणजे बहिणीची आपल्या भावावर खूप माया (प्रेम) असते, या मायेपोटी ती कोणताही त्याग करते.

हे शेवगाव येथील घटनेने समोर आले आहे. एका नऊ वर्षाच्या बहिणीने आपल्या तीन वर्षीय भावाला चक्क बिबट्याच्या तावडीतून वाचविले. यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे शनिवारी सायंकाळी घडली. शंभू संतोष केसभट (वय ३वर्षे ), असे जखमी मुलाचे नाव आहे. तर अंजली संतोष केसभट असे त्या बहिणीचे नाव आहे.

वाघोली शिवारातील पवार, शेळके वस्तीलगत संतोष शिवाजी केसभट कुटुंबासमवेत शेतात राहतात. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शंभू व त्याची बहीण अंजली घराच्या अंगणात खेळत होते.

त्यावेळी बिबट्याने अचानक पाठीमागून येत शंभूला पकडून शेताकडे घेऊन निघाला परंतु अंजलीने शंभूचा पाय ओढण्याचा प्रयल केला. पण बिबट्याने शंभूसह तिलाही फरफटत नेले.

या दरम्यान अंजलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून वडील, चुलत भावांनी आरडाओरडा करत बिबट्याकडे धाव घेताच शंभूला सोडून बिबट्याने धूम ठोकली.अंजलीने शेवटपर्यंत भावाचा पाय ओढून धरल्याने लहान भावाचे प्राण याचले.

चिमुकल्या अंजलीच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या झटापटीत शंभू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत . ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वाघोली येथे जाऊन केसभट कुटुंबाची भेट घेतली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News