अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील एका तरुणाला सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावरून जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला.

विकास देविदास नरोडे (वय २९, अतिथी काॅलनी श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत बाबासाहेब गायकवाड (दिघी, ता. श्रीरामपूर) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
फेसबूक व इन्स्टाग्रामवरून बदनामीकारक, तसेच समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्याने समाजाच्या भावना दुखवल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews