बापरे !! आता कोरोनासोबत या आजारांचा देखील धोका !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीवामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे साथिचे आजार बळावण्याचा धोका आधिक वाढला आहे.

त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले आहे. पावसाळ्यात कीटकांची उत्पत्ती होते व त्यापासून हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया, हत्तीरोग आदी आजार दरवर्षी बळावतात.

या रोगांपासून अनेक जणांना जीवही गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महापालिका पातळीवर पावसाळ्यात स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते. डेंग्यू हा एडिस एजिप्सी डासापासून होते.

कोणत्याही व्यक्तीला डेंग्यू होऊ शकतो. मात्र प्रामुख्याने लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो. नगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेंटीनल सेंटरमध्ये डेंग्यूची मोफत तपासणी होते.

तर चिकनगुण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासणीसाठी रक्तनमुने पाठविले जातात. ज्या भागात या आजारांचा उद्रेक आहे. त्या भागात नियमित ताप सर्वेक्षण, हिवताप रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविणे. रुग्ण दूषित आढळल्यास रुग्णास उपचार करणे. डेंग्यू संवेदनशील गावात धूर फवारणी करणे.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करणे, डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ताप रुग्णाचे रक्तजल नमुने घेणे. तत्काळ सेंटीनल सेंटरकडून तपासणी करुन घेणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, दूषित कंटेनर रिकामे करणे, त्यात अ‍ॅबेट द्रावण टाकणे, आरोग्य शिक्षणाव्दारे जनजागृती करण्याचे काम जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात येते, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी खुणे यांनी सांगितले.

मागील तीन वर्षात ५८९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. यात सन २०१७ मध्ये ३६५ रक्तनमुने तपासले यात ७८ रुग्ण आढळले. पैकी एकाचा मृत्यू. २०१८ मध्ये ६१५ रक्तनमुने यात १४५ रुग्ण आढळले. २०१९ मध्ये १४४० रक्तनमुने तपासले ३५९ रुग्ण आढळले. २०२० जानेवारी ते मार्च ४९ रक्त नमुने तपासले ७ रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment